चांगले आरोग्य मिळण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे उपाय करतात. काहीजण आपल्या नेहमीच्या खाण्या-पिण्यामध्ये योग्य बदल करतात तर काहीजण जिममध्ये जाऊन फिटनेस व्यवस्थित ठेवतात. मात्र चांगले आरोग्य मिळावे यासाठी अनेकजण आपल्या नेहमीच्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करून घेतात. प्रोटीन शरीरासाठी महत्वाचे स्त्रोत आहे. फिटनेस ठेवण्यासाठी आणि मसल्स बनण्यासाठीदेखील प्रोटीनचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अनेक सेलिब्रिटींना आपण प्रोटिनबद्दल कौतुक करताना अनेकदा पाहिला असाल. अनेकदा वाटतं की, प्रोटीन मांसाहारमध्ये जास्त प्रमाणात असते. मात्र असे देखील काही शाकाहारी पदार्थ आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे त्यातून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते. ज्यामुळे आपल्याला फिटनेस ठेवण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कोण-कोणत्या शाकाहारी पदार्थ्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला होतील अनेक फायदे.
हेही वाचा: Oranges Benefits: संत्री दररोज नाश्त्यात खाल्ल्याने तुम्हाला ‘हे’ आश्चर्यकारक फायदे मिळतील
दूध आणि दही:
दूध, दही यासारखे पदार्थ घरोघरी पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. दहीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे आपल्या हाडांना आणि दातांना मजबूत बनवण्यास मदत करते. तर दुधामध्ये कॅल्शियम, आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असतात. दूध आपल्या शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीन देते. दहीमध्ये व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दूध शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करते. मात्र, दूध आणि दही यांचे एकत्र सेवन करणे टाळावे.
दूध आणि दही यांचे सेवन कश्या पद्धतीने करावे?
शक्यतो, दूध आणि दही यांचे एकत्र सेवन करणे टाळावे. त्याच्यामुळे डायरिया, ॲसिडिटी, गॅस होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दहीचे सेवन 100 ग्रॅम इतकेच करावे.
हेही वाचा: थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर
ड्रायफ्रूट:
अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता यासारख्या ड्रायफ्रुटसचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅलशियम, प्रोटीन यासारख्या अनेक पौष्टिक तत्व असतात ज्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत.
मसूर डाळ:
1 कप मसूर डाळीमध्ये 180 कॅलरीज असतात, 10 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ग्रॅम फायबर असतात. त्यासोबतच संपूर्ण मसूर डाळीच्या सर्व्हिंगमध्ये 14 ग्रॅम प्रोटीन आणि 8 ग्रॅम फायबरसह सुमारे 120 कॅलरीज असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी मसूर डाळ उत्तम स्त्रोत आहे. मसूरच्या डाळीमध्ये कमी चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट असते ज्यामुळे त्याचा आपल्या शरीलाला विविध प्रकारे फायदा आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)