Heart Disease Rates: हृदयरोग आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तरुण वयातील लोकही या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणून ओळखला जाणारा हा आजार आज जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. जागतिक आकडेवारीनुसार, दर 34 सेकंदाला एक व्यक्ती हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडतो. एकट्या अमेरिकेत 2023 मध्ये 9 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. तर इतर काही छोटे देश आहेत, जिथे परिस्थिती आणखी गंभीर आहे.
कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू?
उझबेकिस्तान – दर 1 लाख लोकांमागे सुमारे 798 मृत्यू हृदयरोगामुळे होतात.
नौरू – 2021 मध्ये दर 1 लाखांमागे 722 जणांचा मृत्यू हृदयरोगामुळे झाला. हा देश खराब आहार आणि लठ्ठपणामुळे अव्वल स्थानावर आहे.
अझरबैजान आणि ताजिकिस्तान – दर 1 लाखांपैकी 600 हून अधिक मृत्यू.
अफगाणिस्तान – येथे दर 100 पैकी 12-13 लोक हृदयरोगाने प्रभावित.
हेही वाचा - High BP Treament Tool: आता ऑनलाइन टूल्सद्वारे काही मिनिटांत करता येणार उच्च रक्तदाबावर उपचार
अमेरिकेतील परिस्थिती
अमेरिकेत दर 40 सेकंदाला एक व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. 2022 मध्ये फक्त कोरोनरी हृदयरोगामुळे 3.7 लाख मृत्यू झाले. विशेष म्हणजे, 2023 मधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी प्रत्येक 6 पैकी 1 जण 65 वर्षांपेक्षा कमी वयाचा होता.
हृदयरोगाची मुख्य कारणे
उच्च रक्तदाब
उच्च कोलेस्ट्रॉल
धूम्रपान
लठ्ठपणा
चुकीचा आहार
व्यायामाचा अभाव
हेही वाचा - Breast Cancer: 'हा' सामान्य आजार स्तनाच्या कर्करोगाला बनवतो आणखी प्राणघातक; नवीन अभ्यासातून खुलासा
हृदयरोग आता संपूर्ण जगासाठी गंभीर इशारा ठरला आहे. बदलती जीवनशैली, अस्वस्थ आहार आणि तणाव यामुळे तरुण पिढीही त्याच्या विळख्यात अडकत आहे. वेळेत उपचार आणि जीवनशैलीत सुधारणा केली, तर या आजारामुळे होणारे लाखो मृत्यू टाळता येऊ शकतात.
(Disclaimer: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)