Wednesday, August 20, 2025 12:57:09 PM

प्रत्येक गोष्टीवर मुलांची 'वाहवा' करणे थांबवा; नाहीतर होतील गंभीर परिणाम

सामान्यत: पालक मुलांची प्रशंसा त्यांना प्रेरित करण्यासाठी करतात, जेणेकरून पुढील खेपेस ती अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, याचा कधीकधी उलटा परिणाम होऊन मुलांच्या डोक्यात हवा जाऊ शकते.

प्रत्येक गोष्टीवर मुलांची वाहवा करणे थांबवा नाहीतर होतील गंभीर परिणाम

Stop Admiring Your Kids Every Time : जर तुम्हीही तुमच्या मुलाची प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी प्रशंसा करत असाल, तर थोडी सावधगिरी बाळगा. कारण, जेव्हा मुलाला कठोर परिश्रम न करताही प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी प्रशंसा मिळवण्याची सवय होते, तेव्हा त्याला खऱ्या मेहनतीचे महत्त्व समजत नाही.

सामान्यत: पालक मुलांची प्रशंसा त्यांना प्रेरित करण्यासाठी करतात, जेणेकरून पुढील खेपेस ती अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. योग्य वेळी केलेले कौतुक मुलांना आत्मविश्वास देते आणि त्यांना सकारात्मक दिशेने पुढे जाण्यास प्रेरित करते. परंतु बर्‍याच वेळा असे दिसून येते की, काही पालक प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मुलांची प्रशंसा करतात, मग ते काम खरोखर कौतुकास्पद असो वा अगदी साधे असो.

हेही वाचा - आईचा राग आवश्यकच; पण छोट्या-छोट्या गोष्टींत अति रागावण्याने चिमुकल्यांना बसतो मोठा धक्का

पालकांचा हा दृष्टिकोन त्यांना स्वतःला प्रेम आणि प्रेरणांनी भरलेला वाटू शकतो. परंतु, नकळत ते मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचवू शकते. हळूहळू, अशा मुलांमध्ये खोट्या आत्मविश्वासाची भावना निर्माण होऊ शकते आणि ते खऱ्या मेहनतीचे महत्त्व समजणे थांबवतात. म्हणून हे लक्षात ठेवा. अन्यथा, नंतर तुम्हाला असे वाटेल की, हे कोणीतरी तुम्हाला आधी सांगितले असते तर बरे झाले असते.

जर पालक प्रत्येक गोष्टीत मुलांचे कौतुक करत राहिले, तर मुलाला असे वाटू लागते की त्याला कोणतेही विशेष कष्ट न करताही पालकांकडून कौतुक मिळते. म्हणूनच, हळूहळू मुलाला असे वाटू लागते की त्याला काहीही मोठे किंवा विशेष करण्याची आवश्यकता नाही. कारण, प्रत्येक परिस्थितीत त्याचे कौतुक केले जाईल. हे त्याच्या भविष्यासाठी चांगले नाही, म्हणून पालकांनी असे करू नये.

प्रशंसा महत्त्वाची आहे. परंतु,  ती खरी आणि योग्य असली पाहिजे. आपल्या मुलांचे कौतुक आपण अशाच वेळी करायला हवे, जेव्हा त्यांनी खरोखरच एखादी कौतुकास्पद गोष्ट केलेली असेल. प्रत्येक पालकाने हे समजून घेतले पाहिजे की मुलांचे कौतुक करणे महत्वाचे आहे, परंतु जेव्हा ते खरोखर कौतुकास पात्र असेल आणि पूर्णपणे न्याय्य असेल तेव्हाच. पालकांनी छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये अशी प्रतिक्रिया देऊ नये, जसे काही मुलाने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे.

हेही वाचा - सूर्यस्नानानंतर आता 'वनस्नाना'चा ट्रेंड वाढतोय.. तुम्हाला माहीत आहेत का याचे फायदे?

असे होऊ नये की, मुलाने नुकतेच सहभाग ट्रॉफी जिंकली आहे आणि तुम्ही अशी प्रतिक्रिया देत आहात की, जणू त्याने राष्ट्रीय स्तरावर मोठा विजय मिळवला आहे. तुमच्या अशा अतिप्रशंसेमुळे मुलाला असे वाटू शकते की,  मला काहीही न करता हे सर्व कौतुक मिळत आहे. मग आयुष्यात काही विशेष करण्याची काय गरज आहे? किंवा काही वेळेस कौतुक केले नाही तर त्याला राग येऊ शकतो किंवा काही वेळेस कौतुकाची किंमत राहणार नाही असे होऊन अहंकार वाढू शकतो. पालकांनी त्यांच्याकडून होणारे कौतुक ही अशी किंमत ठेवावी, जी परिश्रमानंतरच मिळते. यामुळे मुले ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतील. ही बाब पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री