Sunday, August 31, 2025 07:38:59 AM

Diet For Kidney Health: किडनी निकामी होण्याचा धोका टाळायचाय? 'या' 5 पदार्थांचा आहारात करा समावेश

किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून तो रक्त शुद्ध करण्याचे, विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि द्रव संतुलन राखण्याचे काम करतो.

diet for kidney health किडनी निकामी होण्याचा धोका टाळायचाय या 5 पदार्थांचा आहारात करा समावेश

Diet For Kidney Health: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या आहारामुळे किडनीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून तो रक्त शुद्ध करण्याचे, विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि द्रव संतुलन राखण्याचे काम करतो. परंतु चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आणि दुर्लक्षामुळे किडनी फेल्युअरची समस्या वाढत आहे. परंतु, योग्य आहाराने ही समस्या टाळता येऊ शकते.

हेही वाचा - 3 Worst fruit juices for health: 'या' तीन फळांचा रस पित असाल तर आरोग्य सुधारण्याऐवजी...

किडनीच्या आरोग्यासाठी आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी - 

हिरव्या पालेभाज्या: पालक, केल, कोबी, मेथी यामध्ये मॅग्नेशियम, फायबर आणि नायट्रेट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवून किडनी निरोगी ठेवतात.

ओमेगा-3 युक्त मासे व ऑलिव्ह ऑइल: सॅल्मन, सार्डिनसारखे मासे आठवड्यातून किमान दोनदा खाणे फायदेशीर आहे. तसेच रिफाइंड तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल वापराल्याने किडनीचे आरोग्य निरोगी राहते. 

डाळी व बीन्स: राजमा, हरभरा, मसूर डाळ हे फायबर व प्रथिनांचे उत्तम स्रोत असून ते रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

बेरीज: ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करतात आणि किडनीचे आरोग्य टिकवतात.

हेही वाचा - Dark chocolate: डार्क चॉकलेटचे 'हे' अद्भुत आरोग्य फायदे; जाणून घ्या

किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा 

जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ (अतिरिक्त मटण, अंडी, प्रोटीन पावडर)
सोडियमयुक्त पदार्थ (जास्त मीठ, लोणची, पापड, सॉसेस)
पोटॅशियमयुक्त पदार्थ (बटाटा, केळी, टोमॅटो जास्त प्रमाणात)
प्रक्रिया केलेले पदार्थ
साखर व गोड पदार्थ
दारू व कॅफिन

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 
 


सम्बन्धित सामग्री