Sunday, August 31, 2025 11:45:54 AM

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्कार

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. &quotराजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कारानं&quot देशमुख कुटुंबियाला सन्मानित करण्यात आलंय.

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्कार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मोर्चे लढण्यात आले. अनेक मोर्च्यांमध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झाले. यातच आता संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. "राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कारानं" देशमुख कुटुंबियाला सन्मानित करण्यात आलंय. 

हेही वाचा: MVA Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला

या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि शिवजयंती समितीचे अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले असून देशमुख कुटुंबीयांना एक लाख रुपये आणि सन्मान पत्र देण्यात आलंय.  यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या जीवन चरित्रावर एक दोहा देखील गायला. यावेळी देशमुख कुटुंबीयांसह कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांना देखील अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

यावेळी रमाई भिमाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, गाडगे महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर तब्बल तीन तास ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी कीर्तनातून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .सार्वजनिक शिवजन्मोस्तव सोहळा समितीचे अध्यक्ष तुषार पाटील जाधव, प्राध्यापक नामदेव दळवी व समितीच्या वतीने कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे व बंधू-भगिनींचे आभार मानले.

दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मोर्चे लढण्यात आले. अनेक मोर्च्यांमध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी झाले. यातच आता संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. "राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कारानं" देशमुख कुटुंबियाला सन्मानित करण्यात आलंय. 


सम्बन्धित सामग्री