Sunday, August 31, 2025 06:31:43 AM

Mohan Bhagwat On Family Planning: 'हम दो, हमारे तीन...'; मोहन भागवत यांचे जनतेला आवाहन

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 'हम दो, हमारे तीन', असे धोरण प्रत्येक कुटुंबाने स्वीकारावे, असे आवाहन केले. हिंदूंमध्ये पूर्वीपेक्षा कमी मुले होत आहेत आणि पुढील काळात ही संख्या आणखी कमी होऊ शकते.

mohan bhagwat on family planning हम दो हमारे तीन मोहन भागवत यांचे जनतेला आवाहन

Mohan Bhagwat On Family Planning: देशाची राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘संघ यात्रेची 100 वर्षे: नये क्षितिज’ या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणावर भाष्य करत मोठे विधान केले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 'हम दो, हमारे तीन', असे धोरण प्रत्येक कुटुंबाने स्वीकारावे, असे आवाहन केले. मोहन भागवत यांच्या या विधानानंतर लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन आणि समाजरचनेवर नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, जगातील सर्व धर्मग्रंथ सांगतात की ज्यांचा जन्मदर 3 पेक्षा कमी आहे, ते हळूहळू नामशेष होतात. डॉक्टरांचेही मत आहे की विवाहाला जास्त उशीर न करता आणि तीन मुले झाल्याने पालक व मुलांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मुलांमध्ये परस्पर सहकार्याची आणि अहंकाराचे व्यवस्थापन करण्याची क्षमता विकसित होते. 

हेही वाचा Women Safety Report: शहरी भागातील 40 टक्के महिला असुरक्षित; दिल्ली, कोलकाता, रांची सारख्या शहरांमध्ये जास्त धोका

भारताने सरासरी 3 मुलांचे धोरण स्वीकारावे - मोहन भागवत

लोकसंख्येचे गणित स्पष्ट करताना भागवत म्हणाले की, आज देशाची सरासरी 2.1 आहे. गणितात 2.1 म्हणजे प्रत्यक्षात 3 मुले. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आपल्या घरात तीन मुले असण्याचा विचार केला पाहिजे. मात्र, त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारीही घ्यावी. तीनच्या पुढे जाऊ नये, पण आपत्य तीनपेक्षा कमीही नसावीत. 

हेही वाचा - Defence Minister Rajnath Singh : भारतीय सैन्याला पाच वर्षे चालणाऱ्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल!

मोहन भागवत यांनी पुढे सांगितले की, हिंदूंमध्ये पूर्वीपेक्षा कमी मुले होत आहेत आणि पुढील काळात ही संख्या आणखी कमी होऊ शकते. नवीन पिढीने हे लक्षात घ्यावे की तीनपेक्षा कमी मुले असू नयेत. आपल्याला लोकसंख्याशास्त्रावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण लोकसंख्याशास्त्रातील बदलांचे परिणाम केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून, समाजाच्या हेतू आणि भविष्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. 


सम्बन्धित सामग्री