Sunday, August 31, 2025 11:46:06 AM

Nashik: गोदावरी नदीसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मोठा दावा

मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.

nashik गोदावरी नदीसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मोठा दावा

किरण गोटूर, प्रतिनिधी 

नाशिक:  मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे... भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी या संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत.. मात्र हीच नदी प्रदूषित नाही असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांने दिल्याने नवा वाद सुरू झाला आहे.. गोदावरी नदीतील पाणी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्याने यावर नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. 

गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत तसेच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकीकडे नदीला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ असल्याचे आकडेवारी जाहीर केले आहेत.. नाशिक शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेत पाण्याची WQI म्हणजे वॉटर क्वालिटी इंडेक्स तपासण्यात आले याच तपासणीत नदीतील पाणी स्वच्छ आहे आणि नदी प्रदूषित नाही असा दाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांने केलंय. 

Holi 2025 Gujiya Recipe: बनवा होळी स्पेशल खुसखुशीत भजी , प्रत्येकजण करेल कौतुक!

दरम्यान याच दाव्यावर गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीत अनेक ठिकाणी थेट गटारी आणि नाल्याचे पाणी जात आहे तसेच सांडपाणी देखील नदीत मिसळत असल्याने गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ कसा असू शकतो असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्यावर या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.तसेच गोदावरी नदी जर प्रदूषित नसेल तर आगामी कुंभमेळ्यासाठी या नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकार हजारो कोटी रुपये खर्च कस करत आहे असा देखील सवाल या लोकांनी उपस्थित केला आहे.

शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.. या तपासणीत सोमेश्वर, रामकुंड परिसर, तपोवन ,अमरधाम सह आशा सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने mpcb च्या प्रयोग शाळेत तपासून पाणी स्वच्छ असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला आहे... या नदीतील पाण्याची वॉटर क्वालिटी इंडेक्स हे चांगलं असल्याने नदी प्रदूषित नाही असा दावा mpcb ने केले असलेतरी अनेक ठिकाणी गटारी आणि नाल्यातलं पाणी गोदावरी नदीत मिसळत असल्याचे देखील वस्तुस्थिती आहे..

जग गोदावरी नदीमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा होतो त्याच नदी संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे.. ज्या गोदावरी नदी परिसरात असलेल्या रामकुंड मध्ये शाही स्नान पार पडतो या परिसरातून देखील पाण्याचे नमुने तपासण्यात आले.. या तपासणीनंतर रामकुंड परिसरातील देखील पाणी स्वच्छ असल्याचा दावा एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करत असताना दुसरीकडे याच परिसराचा सुशोभीकरण आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकारकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे... सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने या नदीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.. तर दुसरीकडे ही नदी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे..त्यामुळे नदीतलं पाणी जर स्वच्छ असेल तर हा खर्च का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पहिल्यांदा नदी प्रदूषित आहे की नाही हे प्रशासनाला ठरवावं लागणार आहे हे मात्र नक्की.


सम्बन्धित सामग्री