लातूर: लातूरच्या एकुर्गा शाळेच्या सहा खोल्या जीर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. शाळेकडे लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
लातूर तालुक्यातील एकुर्गा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या 6 वर्ग खोल्या अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत. वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरले असून इमारत जीर्ण झाल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा : गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा सन्मान होणार
एकुर्गा येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून तब्बल 232 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आला आहे. त्यामुळे जीर्ण वर्ग खोल्या पाडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वर्गखोल्या बांधण्याची मागणी एकुर्गा येथील पालकांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची इमारत सध्या धोकादायक स्थितीत आहे. लातूर तालुक्यातील एकुर्गा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या 6 वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. धोकादायक वर्गखोल्या पाडून नवीन बांधकाम करण्याची मागणी पालकांनी केली आहे. लातूर तालुक्यातील एकुर्गा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या 6 वर्गखोल्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पाणी शिरले. त्यामुळे इमारत जीर्ण झाली असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.