ठाणे : ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाली आहेत. गेल्या दोन वर्षात 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाली आहेत. शासनाच्या वनविभागाचा अहवाल समोर आला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; डिसेंबरच्या ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे
कांदळवन असाच प्रकारे नष्ट होत राहिलं तर येत्या काळात ठाणे जिल्हा मुसळधार पावसात पाण्याखाली जाईल अशी चिंता पर्यावरण अभ्यासक डॉ प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभला असून या खाडीकिनारीत मोठ्या प्रमाणात कांदळवन असलेले पाहायला मिळते. मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचं शासनाच्या वन विभाग अहवालात समोर आले आहे. खाडीमध्ये येणारे दूषित पाणी शुद्ध करून खाडीत सोडण्याचे काम कांदळवन करत असतं. त्याचप्रमाणे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषूण ऑक्सिजन सोडण्याचं काम देखील हेच कांदळवन करत असतं. मात्र मागील काही वर्षांपासून खाडीवर होत असणारे अतिक्रमण आणि भूमाफियांच्या माध्यमातून खाडीमध्ये करण्यात आलेला भराव यामुळे कांदळवणाला मोठा धोका निर्माण होत असल्याचे चित्र आहे.