Sunday, August 31, 2025 08:08:46 PM

चलन न भरल्यास मोठी कारवाई

अनेक जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना आपल्याला दिसून येतात. मात्र आता वाहतूक नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता चलन न भरल्यास मोठी कारवाई होणार आहे.

चलन न भरल्यास मोठी कारवाई

महाराष्ट्र: अनेक जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना आपल्याला दिसून येतात. मात्र आता वाहतूक नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता चलन न भरल्यास मोठी कारवाई होणार आहे. ट्राफिक दंड जर भरला नाही तर तुमचं ड्राइव्हिंग लायसन्स आता रद्द होणार आहे. नवीन मसुद्यानुसार ई- चलनाचा दंड तीन महिन्यात न भरल्यास चालकाचं लायसन्स आता रद्द होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षभरात सिग्नल तोडणे आणि धोकादायक ड्रायव्हिंगसारख्या तीन चुका केल्यास लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी जप्त करण्याचा प्रस्ताव आहे. ट्राफिक पोलीसांकडून दरवर्षी ई-चालान जारी केले जातात. त्यापैकी एकूण फक्त 40 टक्के लोकांकडून दंड भरला जातो. 

यामुळे सरकारला वसुली वाढवायची आहे. कठोर नियमांमुळे लोक चालान भरण्याविषयी गंभीर होतील, असा सरकारचा विश्वास आहे. ज्या चालकाचे दोन चालान थकीत असतील. त्यांच्या वाहनाच्या विमा प्रीमियम वाढवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे आता वाहतूक नियमात मोठा बदल करण्यात आला असून चलन न भरल्यास मोठी कारवाई होणार आहे.


सम्बन्धित सामग्री