Sunday, August 31, 2025 08:18:52 PM

Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती

पुण्यातील स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे 27 वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणातील बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडेचा शोध सुरू आहे.

pune bus rape case पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती

पुणे : पुण्यातील स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे 27 वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणातील बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडेचा शोध सुरू आहे. गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी एक युक्ती लढवली आहे. गाडेला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी 1 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.

स्वारगेट बस स्टँड आणि पोलिस स्टेशनपासून 100 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेने पुणे हादरले आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.  या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी 13 टीम कार्यरत आहेत. ज्यामध्ये  गुन्हे शाखेच्या आठ पथकांचा समावेश आहे. तांत्रिक विश्लेषणावरून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीच्या कुटुंबाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याचा आज समारोपीय कार्यक्रम

36 वर्षीय गाडे यांचा यापूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. दरोडा आणि साखळी चोरीचे किमान सहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात देखील त्याने चोरी केल्याची माहिती आहे. 2019 पासून तो जामिनावर बाहेर आहे आणि आता स्वारगेटमधील घटनेला 48 तास होऊनही आरोपी फरार आहे. गाडेला पकडण्यासाठी रेल्वे स्थानके आणि बस स्टँडवर पथके पाठवण्यात आली आहेत असे डीसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितले. गाडेने तोंडावर मास्क घातल्यामुळे ओळख पटवण्यास उशीर झाला, असे त्यांनी सांगितले.

स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे 5.45 ते 6 च्या दरम्यान बलात्काराची घटना घडली. ही तरुणी सातारा जिल्ह्यातील तिच्या गावी जाण्यासाठी बसमध्ये चढण्यासाठी वाट पाहत होती. तेव्हा गाडेने तिला दीदी म्हणून बोलावले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणीने सांगितले की, गाडेने तिची चौकशी केली आणि गर्दीच्या डेपोच्या एका कोपऱ्यात उभी असलेली बस तिला तिथे घेऊन जाईल असे तिला सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे त्या बसकडे चालत जात असल्याचे दिसून आले.


सम्बन्धित सामग्री