Tuesday, September 02, 2025 05:12:28 AM

कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून नियमित प्रवास करतात. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की ज्या लोकल ट्रेनमधून आपण नियमित प्रवास करतो, त्याच ट्रेनमधून एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला तर?

कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: लोकलचा प्रवास मुंबईकरांसाठी अविभाज्य घटक आहे. लाखो प्रवासी या लोकल ट्रेनमधून नियमित प्रवास करतात. मात्र, शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी आणि येण्यासाठी याच लोकल ट्रेनमध्ये गर्दी होते. अनेकदा याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, काय होईल जर तुम्हाला कळेल की ज्या लोकल ट्रेनमधून आपण नियमित प्रवास करतो, त्याच ट्रेनमधून एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला तर? ही घटना सत्यात उतरली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना कोपर आणि दिवा या स्थानकादरम्यान घडली आहे. मृत तरुणाचे नाव रुपेश गुजर असून, हा तरुण डोंबिवलीतील तुकाराम नगर येथे राहात होता आणि मुंबईमध्ये काम करत होता. नेहमीप्रमाणे, रुपेश गुजर सकाळी डोंबिवलीहून मुंबईला निघाला होता. मात्र, प्रचंड गर्दीमुळे लोकलच्या रेट्याने तो खाली पडला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लोकलमधील वाढती गर्दी अनेक समस्यांचे कारण:

नोकरीसाठी, शाळा-कॉलेजसाठी अनेकजण लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मात्र, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, लोकल गाड्यांची संख्या काही केल्या वाढत नाही. परिणामी, दररोज हजारो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. परंतु प्रवाशांच्या बेफिकीरपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समस्या कमी होण्याचे नाव घेईना.

प्रवाशांची प्रतिक्रिया:

या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'रेल्वे प्रशासन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना कधी करणार? आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?' असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.


सम्बन्धित सामग्री