मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाकडून एकनाथ शिंदे यूज आणि थ्रो होत असल्याचा घणाघात आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर केला आहे.
'भाजपाकडून शिंदे यूज आणि थ्रो'
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे नेहमी शिंदेवर टीका करताना दिसतात. आज तर त्यांनी भाजपाकडून शिंदे यूज आणि थ्रो आहेत असे सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी उद्धव ठाकरेंवर फटकेबाजी केली होती. याला प्रतिउत्तर देण्याचे काम आदित्य यांनी केले असं म्हणणं वावग ठरणार नाही.
हेही वाचा : मनसेची थेट जुईनगर एसबीआय बँकेला धडक; ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी
काय म्हणाले शिंदे?
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर जोरदार बरसले होते. आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांचे विचार घेऊन जातोय, कुठलीही तडजोड करणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाचा शॉर्ट फॉर्म युटी (UT ) आहे. मग यूज आणि थ्रो म्हणायचं का? असा सवाल करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरणार, आम्ही कचरा कर लावून देणार नाही. या संबंधित आयुक्तांना पत्र दिल्याचे आदित्या ठाकरे यांनी सांगितले. अनेक लोक मुंबईतील विषय घेऊन येतात. मला त्यावर जायचं नाही. गेल्या 5 वर्षात वरळीतील प्रकल्प मार्गी आम्ही लावले आहेत. टॉवर बांधत आहोत. प्रलंबित योजना मार्गी आम्ही लावतो असेही त्यांनी यावेळी म्हटले.