Tuesday, September 16, 2025 06:31:41 AM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक आश्वासने देण्यात आली. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्र: महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक आश्वासने देण्यात आली. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. मात्र आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केली नाहीये. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता अजित पवारांच्या वक्तव्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 

हेही वाचा: गरिबाचा मुलगा डॉक्टर बनावा म्हणून डॉक्टर बनण्याची सुविधा उपलब्ध; नागपूर दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींचे उद्गार

काय म्हणाले अजित पवार? 
31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा, या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक परिस्थिती नाही, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन हवेतच विरल्याची टीका विरोधकांनी केलीय..काहींनी निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण जे सांगितले ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे यंदाच्या सालची आणि पुढच्या वर्षीचेही पिककर्जाचे पैसे भरा. आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला असून विरोधकांवरून जोरदार टीका केली जातेय. दरम्यान आता शेतकऱ्यांच्या यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


 


सम्बन्धित सामग्री