Sunday, August 31, 2025 11:12:22 AM

Shivsena : शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार

महाराष्ट्रात नेहमीच काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

shivsena  शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार

महाराष्ट्र: महाराष्ट्रात नेहमीच काही ना काही राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर आलीय. आणि यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन प्रयागराज येथे  शाही स्नान करण्यासाठी जाणार आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे सर्व खासदार कुंभमेळ्यात सहभागी होणार असून शाही स्नान करणार आहेत.

हेही वाचा: Mahashivratri 2025 : यंदाची महाशिवरात्री कशी आहे खास? महाशिवरात्रीचे महत्त्व आणि उपवासाचे कारण

कुंभमेळा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला मेळा आहे. या महापुनीत स्नानाचे महत्त्व लाखो लोकांच्या पवित्र सान्निध्यात वाढते. त्यात शिवसेनेचे सर्व खासदार सहभाग घेणार आहेत, ही घटना महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची घोषणा करुन, शिवसेना नवा राजकीय संदेश दिला आहे.

शिवसेनेचे खासदार 19 फेब्रुवारी रोजी प्रयागराज पोहोचून, त्या दिवशी होणाऱ्या शाही स्नानात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात त्यांचे धार्मिक भावनेने संलग्न होणे, आणि महाराष्ट्रातील जनतेला एक राजकीय संकेत देणे, हे स्पष्ट होत आहे.दरम्यान आता या राजकीय शाही स्नानामुळे म्हणजेच शिवसेनेच्या खासदारांच्या प्रयागराज दौऱ्यामुळे आगामी राजकीय धोरणांवर कसे परिणाम होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री