अमरावती: अमरावती जिल्ह्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका 13 फूट लांबीच्या अजगराने 20 किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. ही माहिती सर्पमित्राला मिळताच त्याने अथक प्रयत्नाने अजगराला वाचवण्याचा प्रयत्न केला.
अमरावतीच्या सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका 13 फूट लांबीच्या अजगराने 20 किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. ही माहिती सर्पमित्राला मिळताच त्यांच्या अथक प्रयत्नाने अजगराचे प्राण वाचले. मात्र बकरीला यात जीव गमवावा लागला. अजगराने बकरीवर झडप घालून तिला गिळण्यासाठी विळखा घातला. ही माहिती सर्पमित्र अविनाश पांडे यांना दिली. पांडे यांनी अजगराच्या तावडीतून त्या बकरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, बकरीचा यात जीव वाचला नाही. मात्र, अजगराचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी झाले. सर्पमित्र अविनाश पांडे यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागात नोंद करून घेतली.
हेही वाचा : Custard Apple Benefit: सीताफळाचे आरोग्यदायी फायदे
उत्तरप्रदेशातही अजगराने बकरीला गिळल्याची घटना व्हायरल
नुकतच काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एका अजगराने बकरीला गळले होते. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील हर्रैया परिसरातल्या बरदौलिया गावाजवळील नागमणि आश्रमाजवळ कचनी नाल्याच्या भागात घडली.अजगराने बकरीला गिळले मात्र त्याला त्याचा त्रास होत असल्याचे दिसत होते. कारण अजगराने गिळलेली बकरी हळूहळू बाहेर येत होती आणि अजगर हालचाल करत होता. बकरीला गिळल्याने अजगर नको एवढा ताणला गेला होता. याचाच त्याला त्रास होत होता. यामुळे अजगर बराच वेळ हालचाल करत होता. या हालचालीमुळे बकरी हळूहळू बाहेर येत होती. एकदाची बकरी अजगराच्या तोंडातून बाहेर आली. मात्र अजगराच्या गिळण्यामुळे ती मृत झाली होती.