Wednesday, August 20, 2025 03:47:24 PM

Anandacha Shidha: एकनाथ शिंदेंनी आणलेली योजना बंद होणार

नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु आता आनंदाचा शिधा बंद होणार असल्याच्या सर्वत्र चर्चा आहे. आनंदाचा शिधा बंद होणार म्हणजे एकनाथ शिंदेनी आणलेली योजना बंद होणार आहे.

anandacha shidha एकनाथ शिंदेंनी आणलेली योजना बंद होणार

महाराष्ट्र: नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु आता आनंदाचा शिधा बंद होणार असल्याच्या सर्वत्र चर्चा आहे. आनंदाचा शिधा बंद होणार म्हणजे एकनाथ शिंदेनी आणलेली योजना बंद होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या अनेक लोक कल्याणाकारी योजनांची रसद तोडण्यात आल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे. कारण अर्थसंकल्पात या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आले नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. परंतु या दाव्यावर अद्यापपर्यंत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

हेही वाचा: Walmik Karad : तब्बल सहा वेळा वाल्मिक कराडने मागितली खंडणी; दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती आली समोर

काय आहे योजना: 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता. राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटीमुळे ही योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. ही योजना आता बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाची योजना बंद झाली असल्याचं समोर आलंय. याचबरोबर आनंदाचा शिधा बंद होणार म्हणजे एकनाथ शिंदेनी आणलेली योजना बंद होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या अनेक लोक कल्याणाकारी योजनांची रसद तोडण्यात आल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे. कारण अर्थसंकल्पात या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आले नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. परंतु या दाव्यावर अद्यापपर्यंत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


 


सम्बन्धित सामग्री