मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असे नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर काहींनी त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचे समर्थन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते जोशी वादात सापडले आहेत. त्यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे जोशींनी म्हटले आहे. यावर भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंकडून समाचार घेण्यात आला आहे. मुंबईचीच नव्हे महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं असा उपहासात्मक टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे. भैय्याजी जोशींचं वक्तव्य म्हणजे कुटील डाव असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
हेही वाचा : दमानियांनी केलेल्या आरोपांवर धसांचे स्पष्टीकरण
भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याने महायुतीची गोची झाली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असे वक्तव्ये त्यांनी केले आहे. तरीदेखील आमदार राम कदम यांनी त्यांचे खुलेआम समर्थन केले आहे. तर मंत्री नितेश राणे यांनी देखील जोशींचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे. जोशींनी मराठी भाषेचा अपमान केला नाही. जोशींच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आहे? असा सवाल नितेश राणेंकडून केला जात आहे.
मनसेकडून महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची अस्मिता कायम जपली जाते. मराठी भाषेविरोधात बोलणाऱ्यांवर मनसेकडून कारवाई केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. त्यातच आता संघाच्या भैय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे. मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही. हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं असं म्हणत राज ठाकरेंनी भैय्याजी जोशी यांचा समाचार घेतला आहे.