मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंचा पाय खोलात? करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य
महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक या पदाची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आमिषाला बळी पडू नका असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन
अंगणवाडी अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी बालविकास विभागाअंतर्गत भरती केली जात आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. ही पद भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. दरम्यान उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.