BEST Bus Hits Truck प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मुंबई: गोरेगावमध्ये बेस्ट बसची वनराई पोलीस स्टेशनजवळ उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. या अपघातात बस चालक आणि कंडक्टरसह सहा प्रवासी जखमी झाले. ही घटना सकाळी 6:30 च्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले. त्यामुळे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ब, रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या RJ 12 GA 4756 क्रमांकाच्या ट्रकला धडकली. धडकेमुळे बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - रोहिणी खडसेंच्या 'एक्स पोस्ट'नंतर शिंदेंच्या कार्यालयाबाहेरील कचरा पांढऱ्या कपड्याने झाकला
दरम्यान, जखमी प्रवाशांची ओळख पटली असून अशरफ साहिद हुसेन (66), सीताराम गायकवाड (60), भारती मांडवकर (56), सुधाकर रेवाळे (57), पोचिया नरेश कानपोची (30) आणि अमित यादव (35) अशी जखमींची नावे आहेत. अपघातात बस चालक आणि कंडक्टर दोघेही जखमी झाले आहेत.
हेही वाचा - नालासोपारा पोत्यात सापडली नवजात मुलगी; पोलिसांकडून तपास सुरू
जखमी अवस्थेत बस चालकाने आणि कंडक्टरने तातडीने सर्व जखमींना त्वरित उपचारांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, घटनांचा नेमका क्रम निश्चित करण्यासाठी आणि अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू असताना अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.