Wednesday, August 20, 2025 03:55:44 PM

सावधान! बनावट शेअर अ‍ॅपद्वारे ठाण्यातील गुंतवणूकदाराला 2 कोटींचा गंडा

ठाण्यातील 63 वर्षीय निवृत्त व्यक्ती एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या जाळ्यात अडकून तब्बल 2.02 कोटींचा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सावधान बनावट शेअर अ‍ॅपद्वारे ठाण्यातील गुंतवणूकदाराला 2 कोटींचा गंडा
Edited Image

मुंबई: सध्या सायबर गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांची लाखो रुपयांची लूट करत आहेत. ठाण्यातील 63 वर्षीय निवृत्त व्यक्ती एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या जाळ्यात अडकून तब्बल 2.02 कोटींचा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 एप्रिल रोजी व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेल्या एका लिंकने त्याला या फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.

पीडित व्यक्ती एका शेअर गुंतवणूक चर्चासत्राच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला. त्यानंतर, बनावट नफा प्रमाणपत्रे आणि विश्वासार्ह वाटणाऱ्या गटाच्या चर्चांमुळे त्याचा विश्वास बसला आणि त्याने एक बनावट ट्रेडिंग अ‍ॅप डाउनलोड केले. 9 एप्रिल ते 19 मे 2025  या कालावधीत त्याने 21 वेळा पैसे ट्रान्सफर करत एकूण या अॅपमध्ये एकून 2.02 कोटी गुंतवले.

हेही वाचा - ठाण्यात 30 टक्के परताव्याचे आमिष दाखवून 72 वर्षीय व्यक्तीची 83 लाखांची फसवणूक

दरम्यान, फसवणूक करणाऱ्यांनी अ‍ॅपमध्ये बनावट कमाईचे आकडे दाखवून शेअर ट्रेडिंगमध्ये नफा असल्याचा आभास निर्माण केला. मात्र, पैसे मागितल्यावर त्याला 10 टक्के अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल असे सांगितले गेले. शेवटी, स्कॅमरने सर्व संपर्क तोडला.

हेही वाचा - सासरच्या मंडळींने सुनेला विकलं; यवतमाळमधील लाजिरवाणा प्रकार

तथापी, घटनेची तक्रार मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे. आयटी कायदा 2000 च्या कलम 66 (क) आणि 66 (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री