Wednesday, August 20, 2025 02:16:21 PM

महाराष्ट्रात मोठं स्कँडल, हनी ट्रॅपच्या जाळ्यात कोण कोण अडकलंय?

राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी आणि काही नेते 'हनी ट्रॅप' मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मोठं स्कँडल हनी ट्रॅपच्या जाळ्यात कोण कोण अडकलंय

मुंबई: राज्यात  अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच, राज्यात अशोभनीय प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी आणि काही नेते 'हनी ट्रॅप' मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हनी ट्रॅप प्रकरणात अनेक अधिकारी अडकल्याने या प्रकरणाला 'हाय प्रोफाईल'चे स्वरूप आले आहे. सुत्रांनुसार, काही महिलांनी सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन किंवा पोलिसात तक्रार करेल अशी धमकी देऊन खंडणी मागते असं आरोप करत पुणे, मुंब्रा, कळवा, ठाणे खंडणीविरोधी पथक, इत्यादी ठिकाणी संबंधित महिलांविरोधात तक्रारी दाखल झाले आहेत. 

हेही वाचा: SHUBHANSHU SHUKLA WIFE: पत्नी आणि मुलाला पाहताच भावुक झाले शुभांशु शुक्ला

'हनी ट्र्रॅप'वर नाना पाटोले काय म्हणाले?

बुधवारी काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी विधानसभेत काही आजी-माजी मंत्री हनी ट्र्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढे नाना पटोले म्हणाले की, 'हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्य सरकारशी संबंधित काही गोपिनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने यावर निवेदन करावे', असं वक्तव्य नाना पटोले यांनी केले.  यावर, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निर्देश देत म्हणाले की, 'सरकारने या मुद्द्यांची दखल घ्यावी'. 

विधिमंडळात नाना पटोलेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलिस यंत्रणादेखील जागी झाली असून, या प्रकरणाची गोपिनीय चौकशी नाशिकमध्ये सुरू असल्याचे लक्षात येते. यावर नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली की, 'या बाबत आमच्याकडे अधिकृत तक्रार नाही. या चर्चा आपल्याला माध्यमातून समजले आहे'. या प्रकरणाची व्याप्ती केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून, राज्यातील अनेक नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगितले जात असल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे समजते. 


सम्बन्धित सामग्री