पुणे: भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा ठपका पदाधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे असे त्याचे नाव आहे.
पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे या भाजपा पदाधिकाऱ्याला अटक झाली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणानंतर भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. प्रमोद कोंढरेला पदमुक्त केलं आहे. भाजपात चुकीला माफी नाही अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा: गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद
चित्रा वाघ यांचा संताप
अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. भाजपा पदाधिकारी प्रमोद विठ्ठल कोंढरेने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला. संबंधित पदाधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त केल्याची माहिती आहे. अर्थात,आम्ही इतक्यावरच थांबणार नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करेन. भाजप हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. आरोपी आमच्या पक्षाचा का असेना कुणालाही माफी नाही असे भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हटले आहे.
चित्रा वाघ यांची एक्स पोस्ट
आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला. आताचं यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहिती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. अर्थात,आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही.