Sunday, August 31, 2025 05:47:35 PM

Mumbai Shocker: LTT कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह; हत्येचा संशय

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

mumbai shocker ltt कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह हत्येचा संशय
प्रतिकात्मक प्रतिमा

Mumbai Shocker: शनिवारी पहाटे मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली. कुशीनगर एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22537) च्या एसी कोच बी2 च्या बाथरूममध्ये 7-8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास लक्षात आली. प्राप्त माहितीनुसार, ही ट्रेन काशी एक्सप्रेस (15017) म्हणून निघालेली होती. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सध्या रेल्वे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुलीची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी बोरिवली-वसई स्लो ट्रेनमध्ये घडली. अमोल किशोर सपकाळे असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, तो मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो दारूच्या नशेत महिला डब्यात शिरला. त्याने तिकीट तपासणीच्या बहाण्याने महिलांना मारहाण केली.

हेही वाचा - Uddhav Thackeray On Modi: 'सिंदूर कुठे गेला...त्याचं कोल्ड्रिंक्स झालं का?'; उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका

एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये तो महिलांकडे अयोग्य नजरेने पाहत असल्याचे दिसून आले. व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने महिलांचे मोबाइल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला कंटाळलेल्या प्रवाशांनी त्याला डब्यातून बाहेर काढून स्टेशन मास्टरकडे तक्रार केली.

हेही वाचा - Marbat Festival 2025: 'ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत'; नागपूरची आगळीवेळी ऐतिहासिक परंपरा

गुन्हा दाखल - 

दरम्यान, यानंतर वसई रोड रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सपकाळे यांना ताब्यात घेतले. एका महिला प्रवाशाच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर विनयभंग, गुन्हेगारी धमकी यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून, तो नशेत असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. या दोन वेगळ्या घटनांमुळे मुंबई रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री