Wednesday, August 20, 2025 01:01:24 PM

तासाभरात येतो असं पत्नीला सांगून गेलेल्या उद्योजकाचा आढळला मृतदेह; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये तासाभरात येतो असं पत्नीला सांगितलेल्या 37 वर्षीय उद्योजकाचा पुलाखाली मृतदेह आढळला आहे. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्याजवळ असलेल्या पुलाखाली घडली आहे.

तासाभरात येतो असं पत्नीला सांगून गेलेल्या उद्योजकाचा आढळला मृतदेह छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये तासाभरात येतो असं पत्नीला सांगितलेल्या 37 वर्षीय उद्योजकाचा पुलाखाली मृतदेह आढळला आहे. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्याजवळ असलेल्या पुलाखाली घडली आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

सागर रामभाऊ परळकर असं उद्योजकाचे नाव असून त्यांचे वय 37 होते. मूळचे पैठण येथील असलेले सागर परळकर हे शहरातील कांचनवाडी भागामध्ये कुटुंबासह राहतात. सागर यांची वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये पार्टनरशिपमध्ये पुष्पक ऍग्रो म्हणून कंपनी आहे. या कंपनीत ते संचालक म्हणून काम करतात. ते कांचनवाडी भागात आई, पत्नी आणि दोन लहान मुले यांच्यासह राहतात. 
हेही वाचा: Praful Lodha: हनीट्रॅप प्रकरणात नाव, प्रफुल्ल लोढा पुन्हा गोत्यात, महिलेच्या तक्रारीवरून पुण्यात गुन्हा दाखल

दरम्यान रविवारी ते दुचाकीने कन्नड येथे गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सागर यांचा पत्नीशी मोबाईल वरून संपर्क झाला. त्यावेळी मी तासाभरात येतो असं सागर यांनी पत्नीला सांगितलं. दरम्यान सोमवारी सायंकाळी करोडी टोलनाक्याजवळ पुलाखाली एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रेखा लोंढे या अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेहाच्या शेजारी असलेल्या मोबाईल व आधार कार्डवरून सागर परळकर यांची ओळख पटली. मृतदेह शेजारीच सागर यांची दुचाकी देखील आढळून आली.

मृतदेहापासून काही अंतरावर ट्रकची नंबर प्लेट....
करोडी टोलनाक्यावर सागर परळकर यांचा मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या काही अंतरावर एका ट्रकची नंबर प्लेट आढळून आली आहे. 'टी एस 15 यु ई 69 34' असा त्या नंबर प्लेटचा क्रमांक आहे. संबंधित ट्रक चालकाला पोलिसांनी संपर्क साधून हजर हजर राहण्याची सूचना केली आहे. 


सम्बन्धित सामग्री