रोहन कदम. प्रतिनिधी.पुणे: बाप्पाचे आगमन सुरू होण्यापूर्वीच विसर्जन मिरवणूकीबाबत वादाची ठिनगी पडली की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच, पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणूकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, काही गणेश मंडळींनी मानाच्या पाच गणपतींची विसर्जन होण्यापूर्वीच मिरवणूकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळींनी व्यक्त केली. सकाळी दहा वाजल्यापासून पुण्याची विसर्जन मिरवणूक सुरू होते. मात्र, यंदा अनेक मंडळींनी मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक होण्यापूर्वीच सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली.
हेही वाचा: Navi Mumbai : उंदराने खाल्लेले आईसक्रीम ग्राहकांना; सीवूड्स मॉलमध्ये अजब प्रकार
बाळासाहेब ठाकरे कलादालनात पुण्यातील गणेश मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत सत्तरहून अधिक मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या दरम्यान, पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ पाहता मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक होण्यापूर्वी मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळांनी व्यक्त केली. गेल्या अनेक दशकांपासून पुण्यातील लक्ष्मी रोडवर विसर्जन मिरवणूक होते. या मिरवणुकीत, सुमारे तीनशेहून अधिक गणेश मंडळी सहभागी होतात. मात्र, मानाच्या पाच गणपतींची विसर्जन होईपर्यंत सायंकाळ होते. यासह, पुण्याची विसर्जन मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरु होते. मात्र, यावेळी अनेक मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या आधी सात वाजल्यापासुन मिरवणूकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासोबतच, प्रत्येक मंडळाने एकच ढोल ताशा पथक वापरावे, अशी देखील या बैठकीत चर्चा झाली.