बीड: संतोष देशमुख यांचे साडु दादा खिंडकर याचा एका तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मारहाणीचा व्हिडीओ जुना असल्याचे दादा खिंडकरने सांगितले होते आणि प्रकरण मिटल्याचं त्याच्याकडून सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
गुरूवारी सकाळी दादा खिंडकर पोलिसांंना शरण आला आहे. दादा खिंडककरसह चार ते पाच जण तरूणाला बेदम मारहाण करत होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याचा संशय आहे.
हेही वाचा : स्वारगेट प्रकरणात नवा वाद, आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे खळबळ!
संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात धनंजय देशमुख यांच्यासोबत दादा खिंडकर दिसला. त्यानंतर त्याचा व्हिडीओ समोर आला. बीडमध्ये मागील काही दिवसांपासून काही नेत्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होताना दिसत आहेत. भाजपा आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवलेला आहे. याच नेत्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
व्हिडीओ व्हायरल होण्यामागे राजकारण असल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. ज्यांना काम नाहीत. तेच लोक व्हिडीओ व्हायरल करण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. मागील काही महिन्यांपासून बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे बीडमधील पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.