Sunday, August 31, 2025 02:20:09 PM

देशमुखांचा खटला चालविणाऱ्या न्यायाधीशांबाबत दमानियांनी केला खळबळजनक दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींसोबत खटला चालवणाऱ्या न्यायाधिशांनी होळी खेळली असल्याचा दावा केला आहे.

देशमुखांचा खटला चालविणाऱ्या न्यायाधीशांबाबत दमानियांनी केला खळबळजनक दावा

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळेचं वळण प्राप्त होत आहे. दिवसेंदिवस एकेक खुलासे समोर येत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींसोबत खटला चालवणाऱ्या न्यायाधिशांनी होळी खेळली असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील होळी खेळतानाचे फोटो व्हायरल केले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात काही पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. तर काहींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. देशमुख प्रकरणाचा खटला चालवत असणाऱ्या न्यायाधीशांचे फोटो या पोलिसांसोबत पाहायला मिळत आहेत. हे फोटो व्हायरल करत दमानियांनी बीडमधील आणखी एक प्रकार उघड केला आहे. 

हेही वाचा : बीडमधल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

काय म्हणाल्या दमानिया? 
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? असा सवाल करत प्रकरण उघडकीस आणले आहे. संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधिर भाजीपाले निलंबित पोलिस उपनिरीक्षक आणि रजेवर असणारे पोलीस निरीक्षक यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता जर आरोपीला वाचणारे न्यायाधीश निलंबित आधिकारी यांच्यासोबत केस चालू असताना होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. 

                 

सम्बन्धित सामग्री