बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांमध्ये व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचा कार्यकर्ता सतीश भोसले एका व्यक्तीला बॅटने मारत आहे. तसेच भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. याप्रकरणावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे.
अंजली दमानिया यांनी व्हिडीओ पोस्ट करत बीडमधील एक प्रकार उघड केला आहे. 500 नोटांचा बंडल फेकतानाचा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. तसेच सतीश भोसले याचा एका गरीब व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारतानाचा व्हिडीओदेखील त्यांनी पोस्ट केला आहे. बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले हा आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचे दमानियांनी म्हटले आहे.
हेही वाचा : दमानियांकडून व्हिडीओ व्हायरल; धसांवर केले मोठे आरोप
‘सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता’
बीडमधील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी एक एक व्हिडीओ शेअर करत बीडमधील दहशत आणि गुन्हेगारी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. देशमुखांच्या हत्या प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल करत त्यांनी धनंजय मुंडे निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच आता बीडमधील आणखी एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत. सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे. मुंडे आणि कराड जे करतात तेच सुरेश धस करतात असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच म्हणून बीडच्या मोर्चात सहभागी झाले नाही. धस मोर्चात असल्यानं मोर्चात सहभागी झाले नाही असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
‘सतीश भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे’
दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. भोसलेला ओळखतो, मात्र कारनाम्यांविषयी माहिती नाही. या प्रकरणात सतीश भोसलेचा हात असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका आमदार धस यांनी मांडली आहे.
हेही वाचा : 'अबू आझमीला उत्तर प्रदेशात पाठवा' योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य
भाजपा आमदार सुरेश धस यांच्या समर्थकाने एका गरीब व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सतीश भोसले असे या व्यक्तीचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेचा आता आणखी एक प्रताप उघड झाला आहे. त्याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये 500 च्या नोटांचे बंडल फेकताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत हा कार्यकर्ता कोण? आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी करा आणि अटक करा असे म्हटले आहे.