Sunday, August 31, 2025 02:35:36 PM

पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे

पुण्यात मद्यधुंद तरूणाने अश्लील चाळे केले आहेत.

पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे

पुणे : पुण्यात मद्यधुंद तरूणाने अश्लील चाळे केले आहेत. येरवडच्या शास्त्रीनगर चौकात तरुणाचं हे कृत्य पाहायला मिळाले. सकाळच्या सुमारास तरूणाचे सिग्नलवर अश्लील चाळे सुरू होते. आलिशान गाडीतून उतरून तरूणाने चौकात लघुशंका केली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पुण्यात शनिवारी सकाळच्या सुमारास एका तरुणाने भरचौकात असलेल्या सिग्नलवर अश्लील चाळे केले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पुण्याच्या येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात तरुणानं हे कृत्य केलं. दरम्यान या घटनेची पुणे पोलिसांनी दखल घेतली आहे.  
हेही वाचा: 'महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेणार'
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. नुकतच एका श्रीमंत बापाच्या मुलाने आलिशान कारमधून येत भररस्त्यात लघुशंका केल्याचे कृत्य पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने असे करत असताना त्याला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तरूणाने त्या व्यक्तीच्या समोर अश्लील कृत्य केले आणि कारमध्ये बसमधून मित्रासह फरार झाला.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.

या प्रकरणावर राजकीय मंडळींनी भाष्य केले आहे. हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या. राजकीय पाठिंब्यामुळे पुण्यात तरूणांना मस्ती आली असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

              

सम्बन्धित सामग्री