नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच पंतप्रधान मोदी नागपूरात दाखल झाले आहेत. नुकतच त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम केंद्राची पायाभरणी केली आहे. यावेळी त्यांनी नागपूर वासियांना संबोधित केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरकरांना संबोधित केले. यावेळी सर्वप्रथम त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस फार विशेष आहे. आजपासून नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू होतो. देशातील अनेक ठिकाणी आज गुढीपाडव्यासह इतर सण साजरे केले जात आहे. आज स्मृती मंदिर येथे जाऊन हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना श्रध्दमजारलकी अर्पण करण्याची संधी मिळाली. तसेच संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुढच्या महिन्यात जयंती आहे. त्यांना अभिवादन केलं. तसेच माधव नेत्रालयाच्या एक अशी संस्था आहे. या संस्थेने अनेक दशकापासून लाखो लोकांची सेवा केली. ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण झाला. आज नवीन वास्तू लोकार्पण झाली. त्यामुळे नवीन सेवा कार्याला गती मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
माधव नेत्रालयाच्या कामाची स्तुती करत मोदींनी शुभेच्या दिल्या. लाल किल्ल्यावरून मी सर्वांच्या हिताची गोष्ट बोलली. आज माधव नेत्रालय त्याला वाढवत आहे. देशात गरीबांना देखील चांगले उपचार मिळावे. कोणताही गरीब जीवन जगण्यापासून वंचित राहु नये. ही सरकारची नीती आहे. आम्ही मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली. आगामी काळात लोकांच्या सेवेसाठी सर्वाधिक आणि चांगले डॉक्टर उलब्ध व्हावे म्हणून आम्ही निर्णय घेतला असल्याचे मोदींनी म्हटले.
हेही वाचा : मोदी नागपुरातील शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार
पुढे बोलताना, गरिबांचा मुलगा डॉक्टर बनावा म्हणून डॉक्टर बनण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केली. सामाजिक चेतना करीत नवनवीन आंदोलन असतात. मध्यकाळात आमच्या संतानी राष्ट्रीय चेतना देत ऊर्जा दिली. अनेक संतानी राष्ट्रीय चेतनेकरिता मौलिक विचार दिल आहेत. स्वामी विवेकानंद यांनी निराशात असणाऱ्या समाजाला आत्मविश्वासाचा संचार केला आणि राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही. आपले शरीर परोपकार आणि सेवा करण्यासाठी आहे. सेवा संस्कारात येते. तेव्हा सेवा साधना बनते. साधना, सेवा आणि संस्कार प्रत्येक स्वयंसेवकाना निरंतर गतिमान ठेवते असा अनमोल संदेश मोदींनी दिला आहे.
मोदी म्हणाले, आपले कर्तव्य करत चालत आहोत. छोटे किंवा मोठे कोणताही कार्यक्षेत्र असेल, डोंगराल भाग असेल, तरी संघाचे स्वयंसेवक निस्वार्थ काम करत आहे. कोणी आदिवासी पाड्यात शिक्षण देत आहे. तर कोणी गरीब वंचितांच्या सेवेत आहे. कुंभमध्ये लाखो लोकांची सेवा केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक आहे. कुठेही अडचण आली तर स्वयंसेवक अनुशासित शिपाई म्हणून सेवा भावाने पोहचतो असे त्यांनी सांगितले. एका मुलाखतीत पूजनीय गुरुजींना विचारले, त्यांनी संघाची तुलना प्रकाश आणि उजेडसोबत केली. त्यांनी सांगितले की, प्रकाश सर्वव्यापी असतो. तो अंधाराला दूर करून दुसऱ्याला कार्य करण्याची वाट दाखवतो.
भारत गुलामीच्या मानसिकतेला मागे सोडून पुढे वाटचाल करत आहे. 70 वर्षापासून देशाला मागे टाकले गेले. भारताच्या लोकांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आता भारतीय न्यायसंहिता लागू केली. नौसेनेच्या जागी गुलामी चिन्ह होतं. त्याठिकाणी शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे. 1925 ते 1945 संघर्षाचा काळ होता. आज संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना देश विकासाच्या वाटेवर आहे. आज पुन्हा मोठा लक्ष आपल्यासमोर असल्याचे पंतप्रधानांनी संघाला म्हटले आहे. पुढे बोलताना, आपल्या राष्ट्रासाठी मी लहान दगड बनून राहू इच्छितो असा मानस त्या गुरुजींचा होता. राम मंदिर निर्माणावेळी मी सांगितल होतं की, आम्ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणार आहोत.