अकोला : प्रेम प्रकरणावरून मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अकोल्यात ही घटना घडली आहे. करण चितळेवर हा हल्ला करण्यात आला आहे. संध्याकाळच्या सुमारास हल्लेच्या घटनेने खदान परिसर हादरला आहे. हल्लेखोर करण चितळे याचेचं मित्र असल्याचे समजते आहे. प्रेम प्रकरणातून करण याच्यावर चाकूने वार करत हा जिवघेणा हल्ला झाला आहे.
अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरूण करण चितळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन आरोपींनी चाकूने भोसकून करण चितळे याला गंभीर स्वरूपात जखमी केलं आहे. प्रेमप्रकरणातून जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. करणसोबत त्याचा एक मित्रही हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींंना शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा : 31 वर्षांनी लहान असलेल्या रश्मिकासोबतच्या रोमाँटिक सीन्सवरून सलमान खान ट्रोल; ट्रोलर्सला काय म्हणाला?
ऐन संध्याकाळच्या सुमारास हल्लेच्या घटनेने खदान परिसर हादरला. हल्लेखोर करण चितळे याचेचं मित्र असल्याचे समजते आहे. प्रेम प्रकरणातून करण याच्यावर चाकूने वार करत हा जिवघेणा हल्ला झाला. जवळपास या हल्ल्यात तीन जण जखमी आहेत. जखमींमध्ये मारेकरीसुद्धा जखमी झाल्याचे समजते. माझ्या मैत्रिणीला का बघतोय? यावरून थेट करणवर हा प्राणघातक हल्ला झाल्याचं समजते. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातल्या जेतवन नगर भागात घडला. या प्रकरणात खदान पोलिस अधिक तपास करत आहेत.