Bus Catches Fire in Hinjawadi IT Park
Edited Image
Bus Catches Fire in Hinjawadi IT Park: पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी पुण्याजवळ एका खाजगी कंपनीच्या गाडीला आग लागल्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे ही घटना घडली. एक टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेऊन जात होता. जेव्हा गाडी डसॉल्ट सिस्टिम्सजवळ आली तेव्हा अचानक आग लागली, ज्यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी केला.
हिंजवडी येथील पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, काही कर्मचारी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु त्यांचे चार सहकारी स्वतःला बाहेर काढू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - 'समुद्राच्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार'
हिंजवडी परिसरात मिनीबसला आग -
प्राप्त माहितीनुसा, आग लागली तेव्हा टेम्पो ट्रॅव्हलर बसमध्ये 12 कर्मचारी होते. आग लागली तेव्हा मिनीबसचा दरवाजा लॉक होता. त्यामुळे गोंधळ उडाला आणि कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडणे, कठीण झाले. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर चार जण बसमध्ये अडकले. ज्याचा बसमध्ये होरपळून मृत्यू झाला.
हेही वाचा - नागपूरातील हिंसाचार प्रकरणावरुन मंत्री नितेश राणे आक्रमक
वानवडी व्यावसायिक इमारतीला आग -
दरम्यान, शनिवारी पुण्यातील वानवडी येथील जगताप चौक परिसरातील एका व्यावसायिक इमारतीला आग लागली होती. या इमारतीच्या अनेक मजल्यांमधून ज्वाळा आणि प्रचंड धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.