Sunday, August 31, 2025 05:15:50 PM

नागपुरात जीबीएसचा पहिला बळी

राज्यात जीबीएसने थैमान घातले आहे. अशातच आता नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे.

नागपुरात जीबीएसचा पहिला बळी

नागपुर : राज्यात जीबीएसने थैमान घातले आहे. अशातच आता नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात जीबीएसची रूग्णसंख्या वाढत आहे. तर जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. नागपुरात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू  झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षातील जीबीएसचा नागपुरातील हा पहिला बळी आहे. नागपूरच्या पारडी परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला 11 फेब्रुवारीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. निमोनिया झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे या रुग्णाला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याशिवाय आयसीयूमध्ये जीबीएसचे आणखी दोन पुरुष रुग्ण उपचाराखाली असून त्यांचे प्रकृती स्थिर आहे. 

हेही वाचा : मुंबईकरांचा रविवारी होणार खोळंबा
 

नागपुरात जीबीएसचा पहिला बळी
नागपुर जिल्ह्यातील पारडी परिसरात एका ५५ वर्षीय व्यक्तीला ११ फेब्रुवारी रोजी शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ५५ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. निमोनिया झाल्याने श्वास घेण्यास त्रास होता. त्यामुळे रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. यावेळी उपचारादरम्यानच या जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला होता. 


सम्बन्धित सामग्री