मुंबई: मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या 15 डब्ब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या या लोकलच्या 22 फेऱ्या होत आहे. यानंतर आता 44 फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेवर आता 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणार आहे. आता यासाठी सीएसएमटीची जुनी इमार पाडण्यात येणार आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या विस्तारासाठी अडचण असणारी जुनी रुट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, 15 डब्ब्यांच्या एकूण 44 लोकल मुख्य मार्गावर धावणार आहे.
हेही वाचा: देशमुखांच्या हत्येचा कट कुठे आणि कसा शिजला?, साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट
याबाबत अधिक माहिती अशी की, याआधी फक्त 22 फेऱ्या व्हायच्या. मध्य रेल्वेने सीएसएमटी येथे सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा केली आहे. सिग्नलिंगचे सर्व कामकाज नवीन इमारतीत सिफ्ट करण्यात आले आहे. सिंग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाली आहे. त्यामुळे ती पाडणार आहे. ही इमारत पाडल्यावर तब्बल 400 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्म 5 आणि 6 ची लांबी वाढवली जाणार आहे.
यासाठी 11 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी सध्या 290 आहे तर ती आहे 390 मीटर होणार आहे. या प्लॅटफॉर्मवरुन `15 डब्ब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.