मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी महापालिका हद्दीतील सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची मागणी केली. मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे. बांधकामांना परवानगी देताना इमारतींची मराठी नावे ठेवणे अनिवार्य करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
हेही वाचा - Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 25 जुलै रोजी 24 तासांची पाणीकपात जाहीर
मराठीसाठी मनसेचा आक्रमक पवित्रा -
यापूर्वी, त्रिभाषिक भाषा धोरणांतर्गत पहिली इयत्ता पासून हिंदी शिकणे सक्तीचे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध केला होता. समाजातील विविध घटकांकडून आणि मनसेसारख्या राजकीय संघटनांकडून हिंदी लादण्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर, सरकारने सध्या तरी हा वादग्रस्त निर्देश मागे घेतला आहे. या निषेधाच्या यशानंतर, मनसेने आता मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी आपली मोहीम तीव्र केली आहे.
हेही वाचा - पूजा खेडकर यांना मोठा धक्का! नॉन-क्रीमी लेयर OBC प्रमाणपत्र अवैध घोषित
मनसेला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा -
दरम्यान, मनसेला या मुद्द्यावर शिवसेनेचा (यूबीटी) पाठिंबा मिळाला आहे. तथापी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मराठी भाषेच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या अलिकडच्या घटनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाषेच्या राजकारणावरून वाढत्या तणावाकडे लक्ष वेधून श्री. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे की, जर एखाद्यावर मराठी न बोलल्याबद्दल हल्ला झाला तर तो अचानक अस्खलितपणे बोलू लागेल का? आणि जर मराठीच्या नावाखाली भीती पसरवली गेली तर राज्यात नवीन गुंतवणूकदार येतील का?