पुणे: गुरुवारी, मृत वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी 3 वाजता या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. नुकताच, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबियांच्या वकिलाने वैष्णवीचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गुरुवारी हगवणे यांच्या वकिलांकडून काय भूमिका मांडली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा: अमरावती महापालिका हद्दीतील धक्कादायक घटना; सुट्टीच्या दिवशी शाळेतील खिचडीवर डल्ला
बुधवारी हगवणे कुटुंबीयांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अनेक युक्तिवाद केले होते. तसेच त्यांनी एक धक्कादायक विधानही केले होते. 'जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली होती, तेव्हा पाच आरोपींपैकी कोणीही घरात नव्हते', असा खळबळजनक दावा हगवणे यांच्या वकिलांनी केला होता. वैष्णवीची नणंद करिष्माचा फोन जप्त न झाल्यामुळे पोलिसांना तपासणीत अनेक अडथळे येत होते. त्याच मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे, जर आज पोलिसांना आरोपींनी लपवलेला मोबाईल फोन सापडला, तर अनेक प्रश्नांची गुंतागुंत सहज सुटू शकते.
हेही वाचा: RASHI BHAVISHYA TODAY 29 MAY 2025: 'या' राशीच्या लोकांना मिळणार कौटुंबिक मालमत्तेतून फायदा
या प्रकरणातील सह-आरोपी नीलेश चव्हाण यांच्याविरुद्ध स्थायी वॉरंट जारी करण्यात आल्याचे आणि त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या जप्तीची घोषणा आज होऊ शकते, असे वृत्त आहे. पुणे, मुंबई, गोवा आणि कर्नाटकमध्ये त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या 6 पथकांनी त्याच्याबाबत अनेक लोकांची चौकशी करत आहेत.