Sunday, August 31, 2025 08:39:41 AM

लोण्यातून साकारली हनुमानाची मूर्ती; जळगावच्या प्रसिद्ध अवचित हनुमान मंदिराची कथा

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रिधूर येथील अवचित हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनासाठी मोठी अलोट गर्दी केली होती. लोण्याचा मारुती म्हणून या हनुमंताची

लोण्यातून साकारली हनुमानाची मूर्ती जळगावच्या प्रसिद्ध अवचित हनुमान मंदिराची कथा

जळगाव : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रिधूर येथील अवचित हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनासाठी मोठी अलोट गर्दी केली होती. लोण्याचा मारुती म्हणून या हनुमंताची ख्याती आहे. राज्यभरातून भाविक येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दाखल झाले होते. या मंदिरात हनुमंत रायाचे भजन व सुंदर कांड गात भक्तजन हनुमंताच्या भक्तीत तल्लीन झाले. 

अवचित हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य
रिधूर येथे अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. प्रत्‍येक ठिकाणच्या हनुमानाच्या मुर्तीचे एक वैशिष्‍ट आहे. असेच वैशिष्‍ट रिधूर जवळील अवचित हनुमान मंदिरातील मुर्तीचे आहे. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा पीओपीपासून साकारलेली पाहिली असेल. पण भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची मुर्ती येथेच पाहण्यास मिळेल. विशेष म्‍हणजे उन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही.

हेही वाचा : हनुमानाचे एकही मंदिर 'या' गावात नाही

लोण्याचा मारुती म्‍हणून ओळख
गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. नातेवाईकांनी मारुतीकडे त्‍यांच्या दूध न देणाऱ्या म्हशीसाठी नवस केला. म्हैस दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल असे अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्‍कार म्‍हणावा की काय म्‍हणून त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले. यानंतर सदर व्यक्ती लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिराकडे येण्यासाठी निघाला. मात्र मंदिरात जाण्यासाठी त्यांना अंधार झाल्‍याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते. त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जसेच्या तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली आणि ती आजतागायत सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री