Wednesday, August 20, 2025 01:10:19 PM

आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना; गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी काय म्हणाले?

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली.

आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी काय म्हणाले

पुणे : पुण्यात संतापजनक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तनिषा भिसे असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणामुळे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली. आबिटकरांनी आरोग्य उपसंचालकांना सूचना दिल्या आहेत. तसेच चार सदस्य समिती नेमून चौकशी करणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले आहे. 

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची चार सदस्यीय समिती चौकशी करणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी आरोग्य उपसंचालकांना सूचना दिल्या आहेत. ही चार सदस्यीय समिती आज दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात जाऊन चौकशी करणार आहे. समिती जो अहवाल सादर करेल. त्यानुसार रूग्णालयावर कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक, पतित पावन संघटनेचं आंदोलन; आंदोलकांनी डॉक्टरांवर फेकली चिल्लर

गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण नेमके काय?
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांच्या सोबत धक्कादायक घटना घडली आहे. सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे ही गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले. त्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवतीला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले होते. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई  दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारी संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील अमित गोरखे यांनी केली.

 


सम्बन्धित सामग्री