विदर्भ: विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुढील 3 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढील 3 तासांत चंद्रपूर, गडचिरोली येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारपासून जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरु आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथे अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: Dharashiv: दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुली.....
सांगलीत मुसळधार पावसाचे आगमन
सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. चांदोली तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. चांदोलीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला असून पाणीसाठा ही दुप्पट झाला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र सकाळी 11 वाजता झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवले.