मुंबई: राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशातच, राज्यातील काही भागात उष्णता वाढल्याने नागरिकांना विविध समस्या उद्भवत आहे. 'राज्यात पाऊस कधी पडणार', हा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकताच, हवामान खात्याने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे, राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार? यासह, पाच दिवसांसाठी हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांत अलर्ट जारी केला आहे? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह, हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात ऑरेंज, येलो अलर्ट जारी केले आहे.
हेही वाचा: Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात कोकणात जाणार असाल तर इकडे लक्ष द्या; 23 ऑगस्टपासून वाहतुकीत होणार मोठे बदल
हवामान खात्याने दिला 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट
ऑरेंज अलर्ट: चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, रत्नगिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, अकोला, आदी.
येलो अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, गोंदिया, नागपूर, धाराशिव, आदी.