Wednesday, August 20, 2025 12:57:52 PM

मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार! हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' आणि भरतीचा इशारा जारी

आयएमडीने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, ठाणे, रायगड आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार हवामान विभागाकडून यलो अलर्ट आणि भरतीचा इशारा जारी
Heavy rain
Edited Image

मुंबई: हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने शहरात या संदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी शनिवारी रात्री उशिरा मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला होता. भारतीय हवामान खात्याने (IMD) रविवारी शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा - Indrayani River Bridge Collapse: मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; अपघातात बारा जणांचा मृत्यू

'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट - 

आयएमडीने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, ठाणे, रायगड आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या काही भागात शनिवारी रात्रभर मेघगर्जनेसह पाऊस पडला. तथापि, सकाळपर्यंत पावसाची तीव्रता कमी झाली.

हेही वाचा - GHOD DAM PUNE: शिरूरमधील घोड धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात कुठेही जास्त पाणी साचल्याचे वृत्त नाही. रविवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, दक्षिण मुंबईत ३१ मिमी, पूर्व उपनगरात 21 मिमी आणि पश्चिम उपनगरात 20 मिमी पाऊस पडला. 


सम्बन्धित सामग्री