Wednesday, August 20, 2025 05:15:50 AM

'मिशनचं नाव वाचून डोळ्यात पाणी', जगदाळे कुटुंबीय भावूक

आसावरीने 'ऑपरेशन सिंदूर' प्रकरणी आपली भावना व्यक्त केली आहे

 मिशनचं नाव वाचून डोळ्यात पाणी जगदाळे कुटुंबीय भावूक

मुंबई: आसावरीने 'ऑपरेशन सिंदूर' प्रकरणी आपली भावना व्यक्त केली आहे.आसावरीने पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांना ही खरी श्रद्धांजली आहे आणि वडिलांचं बलिदान वाया गेलं नाही हल्लयाचा बदला भारतीय सैनिकांनी घेतला आणि यामुळे हल्ल्यात गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिला यासाठी आभारी आहे. त्याचबरोबर आसावरी म्हणते जेव्हा नातेवाईकांनी कॉल करून सांगितलं बातम्या बघा भारताने हल्ल्याचा बदला घेतला त्याचं नाव आणि या महिमेमागचा अर्थ जेव्हा समजला तेव्हा  आमचे अश्रू अनावर झाले. कारण त्या हल्लेखोरांनी स्त्रियांचे कुंकू पुसून टाकलं नवविवाहित असो व कोणी अनेक पुरुषांचा जीव त्यांनी घेतला आणि या सगळ्याचा विचार करून  'ऑपरेशन सिंदूर' नाव ठेवलं गेलं हे पाहून भावूक झालो. 

आसावरी जगदाळे हिचे वडील संतोष जगदाळे यांना पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. जगदाळे कुटुंब काश्मीर पर्यटनासाठी पहलगाममध्ये गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी जगदाळे कुटुंबाला धर्म विचारून संतोष जगदाळे यांना गोळ्या घातल्या. गेल्या 15 दिवसांपासून जगदाळे कुटुंबात दु:खाचे वातावरण होते. परंतु आता सरकारने केलेल्या कारवाईनंतर आम्हाला समाधान वाटत आहे, असे आसावरीने सांगितले.आज भारताची कारवाई पाहून माझे वडील जिथून हे सगळं बघत असतील तर त्यांना भारी वाटत असेल. त्यांचं बलिदान वाया गेले नाही. असे आसवारीने सांगितले. 

हेही वाचा: पाकड्यांची टरकली, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 'ऑपरेशन सिंदूर' सक्सेसफूल


सम्बन्धित सामग्री