Monday, September 01, 2025 12:53:40 PM

आरोग्यावर घाला! मृतदेहासाठी वापरलेला बर्फ पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातोय, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार समोर

रुग्णालयाच्या शवगृहात मृतदेहासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो. हा बर्फ नंतर गटारात टाकला जातो. मात्र, काही विक्रेते हा बर्फ पुन्हा काढून धुवून पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले

आरोग्यावर घाला मृतदेहासाठी वापरलेला बर्फ पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातोय कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार समोर

कोल्हापूर: उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत अनेक जण उष्णतेमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी थंड प्येय पितात मग उसाचा सरबत असो किंवा बाहेरून विकत घेतलेली थंड पाण्याची बॉटल असो मात्र हे गर वाटणारं पाणी नेमकं कसं गार होत असेल याचा विचार आपण कधी करत नाही तेव्हाची गरज भागतेय ना मग बस पण मात्र अशातच आता  कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेहासाठी वापरला गेलेला बर्फ गटारात टाकल्यानंतर तो पुन्हा बाहेर काढून पाणी थंड करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रुग्णालयाच्या शवगृहात मृतदेहासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो. हा बर्फ नंतर गटारात टाकला जातो. मात्र, काही विक्रेते हा बर्फ पुन्हा काढून धुवून पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. एका नागरिकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनावर ताशेरे ओढले जाऊ लागले. या बर्फाच्या बॉक्समध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या जात होत्या. तिथे मोठ्या प्रमाणावर मुंग्या आणि माश्या दिसून आल्या. इतकी अस्वच्छ परिस्थिती पाहून नागरिकांनी नारळ पाणी विक्रेत्याला जाब विचारला. मात्र, विक्रेत्याने आपली चूक मान्य केली नाही.

हेही वाचा: Ration Card E-KYC: घरबसल्या रेशन कार्डचे ई-केवायसी कसे करायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर होतो. सरबत, उसाचा रस, बर्फाचा गोळा अशा पदार्थांसाठी हा बर्फ वापरण्यात येतो. मात्र, तो किती शुद्ध आहे, याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री