पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा कसून शोध सुरू होता. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे. परंतु गाडेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
महाशिवरात्री दिवशी पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी गाडेने तरुणीवर अत्याचार करुन थेट गाव गाठले. पुणे पोलिस दोन दिवस आरोपीच्या शोधात होते आणि रात्री 1 वाजता गाडेला त्यांनी अटक केली. यावेळी आरोपी गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. एकदा नाहीतर तीन वेळेस त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कीटकनाशक पिण्याचा आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आरोपीला कोर्टात नेताना जनतेचा संताप असल्याने सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
हेही वाचा : मराठी भाषा गौरव दिन 2025: मुंबई जीपीओ येथे उत्साहात साजरा
पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. दत्तात्रय गाडेला गुनाट गावच्या शिवारातूनच अटक करण्यात आली. शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना ताब्यात घेतलं. तब्बल 75 तासांनी आरोपी अटकेत आहे.
अखेर आरोपीला बेड्या
1 पुण्याच्या शिरुर तालुक्यातील एका गावातून आरोपीला अटक
2 रात्री 1 वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
3 आरोपी गुनाट गावच्या शिवारात लपून बसला होता
4 ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरू होतं तिथं तो सापडलाच नाही
5 दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी 10.30 वाजता आला होता
6 दत्तात्रय गाडेनं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली
7 माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला
8 नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली
9 त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला
8 पोलिसांना आरोपीचा बदलेला शर्ट सापडला, त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला
9 डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला
10 मात्र आरोपी ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही
11 आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपू राहिला
12 शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक
13 तब्बल 75 तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश
14 100 ते 150 पोलिसांच्या टीमकडून आजूबाजूच्या उसाच्या शेतांमध्ये शोध मोहीम
15 रात्री उशिरापर्यंत गुनाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं अटक करण्यात यश