नाशिक: मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे चर्चेचा विषय बनलेत. त्यातच आता माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. नाशिक जिल्हा बँकेने या नोटीस बजावल्या असून 15 अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे नेते देखील गोत्यामध्ये येताय की काय असा प्रश्न निर्माण झाला असून नेत्यांमध्ये देखील धाकधूक असल्याचं पाहायला मिळतंय. सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्जवाटपात 182 कोटींची अनियमितता असल्याचं हे प्रकरण आहे. याच संदर्भात आता अडीच वर्षांच्या चौकशीनंतर अधिकाऱ्यांवरही हा ठपका बसणारे. जवळपास 15 अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय.
नेमकं काय आहे प्रकरण ?
नाशिक जिल्हा बँकेच्या 182 कोटींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्याचा आरोप
अनेक आजी- माजी आमदार- खासदारांना कर्जवसुलीसाठी नोटीसा
माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, देवीदास पिंगळेंना नोटीस
जीवा गावित, माजी मंत्री शोभा बच्छाव, शिरीषकुमार कोतवाल, वसंत गीतेंसह 29 जणांना नोटीसा
15 अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही ठपका
नाशिक, निफाड, आर्मस्ट्राँग या सहकारी साखर कारखान्यांसह अनेक संस्थांना नियमबाह्य कर्ज दिल्याचा ठपका
विभागीय सहनिबंधकांकडून संबंधित आरोपींना कर्जवसुलीचे आदेश
अन्यथा आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा इशारा
दरम्यान माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. नाशिक जिल्हा बँकेने या नोटीस बजावल्या असून 15 अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे नेते देखील गोत्यामध्ये येताय की काय असा प्रश्न निर्माण झाला असून नेत्यांमध्ये देखील धाकधूक असल्याचं पाहायला मिळतंय.