Tuesday, September 02, 2025 01:48:48 AM

निलम गोऱ्हेंचं वक्तव्य चर्चेत

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्वत्र प्रसिद्ध ठरली. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये देण्यात येतात.

निलम गोऱ्हेंचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्वत्र प्रसिद्ध ठरली. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपये देण्यात येतात. त्यानंतर ही रक्कम वाढवून 2100 रुपये देण्यात येणार असल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत. परंतु आजही या लाडक्या बहिणी या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहे. यातच आता निलम गोऱ्हेंचं वक्तव्य चर्चेत आलंय. निलम गोऱ्हेंनी लाडक्या बहिणींबाबत हे वक्तव्य केलंय. योजनेच्या 2100 रुपयांच्या हफ्त्याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. 

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

काय म्हणाल्या निलम गोऱ्हे: 

राज्याचा पहिला अर्थसंकल्प झाला आहे. या सरकारचे पाच अर्थ संकल्प होतील. बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री, दोन मुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट घेतील. बहिणांना 2100 रुपये कधी द्यायचे ते राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून ठरवतील. पण 2100 द्यायला 5 वर्षे लागतील, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना आणताना अर्ज करणाऱ्या सर्वच महिलांना सरसकट लाभ दिला गेला. मात्र त्यानंतर या योजनेला निकषाची चाळणी लावण्यात आली. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून बाद झाल्यात. अशातच आता 2100 रुपये देणं लांबणीवर पडल्यानं विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी मिळालीय. दरम्यान निलम  गोऱ्हेंच्या या वक्तव्याने लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा सुरु असून संभ्रम देखील पाहायला मिळतोय. 


 


सम्बन्धित सामग्री