ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा हा जनता दरबार असणार आहे. महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला पाहिजे असे मंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
‘सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे’
सर्वांनाच मंत्रालयात यायला जमतं अशातला भाग नाही काही घटकांना आपली व्यथा कुठे मांडावी कशी मांडावी हे पण समजत नाही आणि म्हणून नवी मुंबईत जनता दरबार झाला. पालघरलाही झाला आणि उद्या ठाण्याला जनता दरबार आहे असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, महायुतीचीच विचारसरणी आहे. सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे. सर्व निर्भय व्हायला पाहिजे.
‘महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला पाहिजे’
सर्वच बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला पाहिजे. महाराष्ट्र थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्यामध्ये या सर्व गोष्टींची नोंदणी आहे. यासाठी सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे असे नाईकांनी म्हटले.
हेही वाचा : एव्हिओ औषध निर्माण कंपनीच्या कारखान्यावर व स्टोरेज गोदामावर छापा; नेमकं काय झालं?
1995 सालापासून मी ज्या ज्या पक्षात राहिलो आहे. त्या त्या पक्षाने एकट्यानेच निवडणुका लढवल्या असल्याचे त्यांनी सांगितले. उद्याला महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ठरवलं एकत्र लढावं तर निश्चितपणे त्याबाबतीत माझा विरोध नाही परंतु त्या त्या वेळेला त्या त्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असे म्हणत नाईकांनी संकेत दिले आहेत.
2006 साली आपल्या राज्यामध्ये 104 वाघ होते. आज आपल्या राज्यामध्ये 444 वाघ आहेत. वाघांच्या वाढणाऱ्या संख्येला कुठेतरी निश्चित बंधन घातलं पाहिजेत किंवा वाघांची दुसरीकडे सोय केली पाहिजे. केंद्र सरकारकडून ज्या सूचना येतील त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.