Thursday, August 21, 2025 05:00:08 AM

लव्ह जिहाद; प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरला घरात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

लव्ह जिहाद प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरला घरात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरुण महिलेचा गळा आवळून तिला खड्ड्यात पुरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. 

जालनातील तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर तिला शेतवस्तीवरील घरात खड्डा करून पुरण्यात आले. मोनिका मार्कस झांबरे या तरुणीला विवस्त्र अवस्थेत खड्ड्यात पुरण्यात आले. ईरफान शेख या इसमाने तिचा खून केल्याचा आरोप होत आहे.  मृत मोनिका ही दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादातनगर येथील रुग्णालयात मोनिका नर्स या पदावर कार्यरत होती. मोनिकाचा विवाह सुमित निर्मळ याच्याशी झालेला होता. मात्र दोघांचे सातत्याने वाद होत असल्याकारणाने मोनिका तिच्या आईवडिलांच्या घरी जालन्यात राहत होती. 

हेही वाचा : मुंबईकरांचा रविवारी होणार खोळंबा
 

नेमका घटनाक्रम 
जालनातील मोनिकाचा विवाह छत्रपती संभाजीनगरच्या सुमित निर्मळ याच्याशी झाला होता. परंतु या दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असल्यामुळे मोनिका आईवडिलांच्या घरी राहत होती. मोनिका ही नर्स असल्याने तिला रोज जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करावा लागत होता. ती छत्रपती संभाजीनगर  महानगरपालिकेच्या सादातनगर येथील दवाखान्यात कामाला येत होती. यासाठी मोनिका रोज रेल्वेने प्रवास करत होती. मात्र 6 फेब्रुवारीला नियमितप्रमाणे ती घरी न पोहोचल्याने तिच्या आई सुनीता झांबरे यांनी पोलिसात मिसिंगचा गुन्हा दाखल केला. आईच्या तक्रारीवरून जालना पोलिसांनी तपास सुरू केला.  पोलिसांच्या तांत्रिक तपासातून मोनिकाचा शोध लागला. ती गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार याच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नांगरे यांनी मोनिकाच्या आईला दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यावर इरफान नावाच्या व्यक्तीने मोनिकाला घरात खड्डा करून पुरल्याचे समोर आले. सहा तारखेला पुरलेला मृतदेह १४ तारखेला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मोनिकाच्या घरच्यांसह गावकऱ्यांनी या प्रकरणात पोलिसांना मदत केली. मोनिकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. मोनिकाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचे माहिती वैद्यकीय अधिकारी शुभम कोणेरी यांनी सांगितले. 

हेही वाचा : ममता महामंडलेश्वर पदावरच राहणार; राजीनामा स्वीकारण्यास त्रिपाठींचा नकार
 

मोनिकाच्या मृतदेहाची विल्हेवाट 

इरफान शेखने मोनिकाला लासूर स्टेशला बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या शेतातील पत्र्याच्या रूममध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून इरफान याने पत्र्याच्या रूममध्ये खड्डा करत मोनिकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. असे करत त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मोनिकाच्या आईने पोलिसांना सांगितले आहे.  


सम्बन्धित सामग्री