Monday, September 01, 2025 09:10:13 AM

SSC 10th Result 2025: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात तब्ब्ल 9 हजार विद्यार्थी नापास; महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी धक्का

Synopsis:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील निकाल जाहीर झाले असून, मराठी विषयात 9 हजार 486 विद्यार्थी नापास झाले आहेत. यामुळे मातृभाषेतील अपयश चिंतेचा विष

ssc 10th result 2025 दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात तब्ब्ल 9 हजार विद्यार्थी नापास महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी धक्का


महाराष्ट्र: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यंदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 9 हजार 486 विद्यार्थी मायबोली मराठी विषयात नापास झाले आहेत. राज्याच्या मातृभाषेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अपयश मिळणे हे निश्चितच चिंतेचा विषय आहे.

यावर्षी एकूण 1 लाख 83 हजार 957 विद्यार्थ्यांनी 36 विषयांमध्ये परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 70 हजार 750 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी प्रथम भाषा म्हणून 1  लाख 56 हजार 225 विद्यार्थ्यांनी निवडली होती, त्यापैकी 93.93 टक्के म्हणजेच 1 लाख 46  हजार 739 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर उरलेले 9 हजार 486 विद्यार्थी नापास ठरले.

हे आकडे दाखवतात की इंग्रजी, हिंदीसारख्या भाषांमध्येही काही विद्यार्थी नापास झाले, मात्र मातृभाषा मराठीत नापास होणाऱ्यांची संख्या काहीशी अधिक लक्षवेधी आहे. इंग्रजीत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून 1 लाख 73 हजार 366 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये 93.79 टक्के यशाचा दर असून 10 हजार 760 विद्यार्थी नापास झाले.

हेही वाचा:SSC 10th Result 2025: दहावीचा निकाल जाहीर; 500 पैकी 500 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी संख्या

मराठीत अपयशामागे अनेक कारणे असू शकतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रुची कमी होणे, शिक्षकांकडून प्रभावी अध्यापन न होणे, मराठी विषयाकडे 'सोप्या' विषयाची म्हणून घेतली जाणारी दुर्लक्ष वृत्ती किंवा पालक-शिक्षकांचा कमी फोकस.

या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमात नाविन्य आणणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना व्याकरण, लेखनकौशल्य, भाषाशुद्धता यांचे महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभिमान निर्माण करणारे उपक्रम शाळा स्तरावर राबवले गेले पाहिजेत.

दहावीचा निकाल केवळ पास-फेलचा आकडा नसतो, तर तो आपल्या समाजाच्या शैक्षणिक आरोग्याचा आरसाही असतो. म्हणूनच मातृभाषा मराठीत विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 9 हजार विद्यार्थी मराठीत नापास होणे म्हणजे महाराष्ट्राच्या भाषिक आणि शैक्षणिक गर्वाला लागलेली ठिणगी आहे.


सम्बन्धित सामग्री